December 26, 2025 1:29 PM | narendra modi | PM

printer

केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवन सुलभ करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री

केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगाने होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की, सरत्या वर्षात आपल्या सरकारने केलेल्या सुधारणांमुळे प्रशासनातला बदल ठळकपणे दिसून आला.

 

या सुधारणा गुंतागुंत सोडवून त्याचा इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी केल्या गेल्या होत्या. कररचनेचं सुलभीकरण, विवादांचं जलदगतीने निराकरण, आधुनिक कामगार संहिता यांमुळे संघर्ष कमी झाला. सरकारचा भर विश्वास, अनुमान आणि दीर्घकालीन प्रगती यावर असल्याचंही मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत.