प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. प्रधानमंत्री मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 29 आणि 30 ऑगस्ट हे दोन दिवस जपानला भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हा आठवा जपान दौरा असेल. तर जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्या समवेत ते पहिल्यांदाच या शिखर परिषदेत सहभागी होतील.
या दौऱ्यात ते त्यांच्या समपदस्थांसमवेत संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान अशी क्षेत्रांमधल्या भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी तियानजिन होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी चीनला रवाना होतील. या परिषदेच्या पार्श्र्भूमीवर चीनमध्ये ते अनेक जागतिक नेत्यांनाही भेटणार आहेत.