प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. हा १६वां रोजगार मेळा देशभरात ४७ ठिकाणी आयोजित केला जाणार असून प्रधानमंत्री यात संबोधन करणार आहेत.
नवीन भरती केलेले युवक रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य-कुटुंब कल्याण, कामगार-रोजगार, पोस्ट यासह अन्य विभागांमध्ये सामील होतील. देशभरात रोजगार मेळ्यांद्वारे आजवर १० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रं जारी करण्यात आली आहेत.