शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात देशाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी, भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतासाठी शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्राला एकत्रित आणणाऱ्या युग्म संमेलनात ते बोलत होते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं हे संमेलन होत आहे.
या तिनही क्षेत्रात सरकार करत असलेल्या कामांची, आणि भविष्यातल्या योजनांची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. युग्म अर्थात – Youth, University, Government, and Market, हा एक प्रकारचा पहिलाच धोरणात्मक मंच असून, यात सरकार, शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्रातलं नेतृत्व एकत्र येत आहे.