फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे आज आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात हजर होणार

फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते आज पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात हजर होणार आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अंमलीपदार्थ विरोधी कारवाईदरम्यान अनेकांच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या अटक वॉरंटखाली अटक झालेले दुतेर्ते हे पहिलेच आशियाई नेते आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी दुतेर्ते यांनी केलेल्या कारवाईत हजारो जणांना ठार केलं असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.