March 14, 2025 7:23 PM

views 28

फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे आज आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात हजर होणार

फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते आज पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात हजर होणार आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अंमलीपदार्थ विरोधी कारवाईदरम्यान अनेकांच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या अटक वॉरंटखाली अटक झालेले दुतेर्ते हे पहिलेच आशियाई नेते आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी दुतेर्ते यांनी केलेल्या कारवाईत हजारो जणांना ठार केलं असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

March 11, 2025 6:44 PM

views 46

फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे यांना मनिला विमानतळावर अटक

फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या वॉरंट अंतर्गत आज मनिला विमानतळावर अटक करण्यात आली. दक्षिण फिलिपिन्समधल्या दावाओ शहराचे महापौर आणि नंतर राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या आदेशावरून झालेल्या नरसंहाराच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. जागतिक न्यायालयाने अशा प्रकारे अटक केलेले ते पहिले माजी आशियाई नेते आहेत. फिलिपिन्स पोलिसांच्या अंदाजानुसार सहा हजाराहून जास्त आणि मानवाधिकार  गटांच्या अंदाजानुसार ३० हजाराहून जास्त नागरिकांच्य...