डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहलगाम हल्ल्यानंतर तात्पुरत्या व्हिजावर राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तात्पुरत्या व्हिजावर राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी परत पाठवलं आहे. हे सर्वजण पर्यटक आणि वैद्यकीय व्हिजावर आले होते. यापैकी ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांना परतण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २९ एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयानेही त्या भागात तात्पुरत्या व्हिजावर राहात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर नजर ठेवायचे निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

असे १७ पाकिस्तानी नागरिक उल्हासनगर भागात राहात असून त्यांना परत जाण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी २०० पाकिस्तानी नागरिकांच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली असून तात्पुरत्या व्हिजावर आलेल्या तिघांना परत पाठवलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबईत २२९ पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिजावर राहात आहेत किंवा व्हिजा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा