डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

चांगल्या कामगिरीच्या आधारेच जनतेनं सलग तिसऱ्यांदा निवडून दिलं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आपलं सरकार चांगली कामगिरी करून दाखवतं या कामगिरीच्या आधारेच आपल्याला देशातल्या जनतेनं सलग तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधे सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतरची त्यांची ही पहिली जाहीरसभा होती.

 

आगामी काळात जम्मू कश्मीर एक राज्य म्हणून आपलं भविष्य घडवेल, या राज्यानं जो विकासाचा मार्ग निवडला आहे, तो मार्ग आपण अधिक उत्तम करणार आहोत., असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

 

प्रधानमंत्री जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते पंधराशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. आपल्या दौऱ्यात प्रधानमंत्री जागतिक योग दिनानिमित्त उद्या आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.