लिची उत्पादनात पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्याचं 60 टक्के योगदान

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जाची लिचीचे उत्पादन घेतले जात असून राज्याच्या लिची उत्पादनात जिल्ह्याचा 60 टक्के योगदान दिले जाते. यामधून शेतकऱ्यांना भरीव उत्पन्न मिळत आहे. पंजाबमध्ये साधारणपणे 3900 हेक्टर क्षेत्रावर लिचीची लागवड केली जाते. तर पठाणकोट जिल्ह्यात हे प्रमाण 2200 हेक्टर इतके आहे. लिचीची पहिली खेप लवकरच परदेशात निर्यात केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि भूजलावरील त्यांचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सुजानपूर येथे यापूर्वीच लिची इस्टेटची स्थापना करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.