August 31, 2024 1:04 PM

views 27

पंजाबमध्ये  पाणीटंचाई चिंताजनक, अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट

पंजाबमध्ये  पाणीटंचाई चिंताजनक असून अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. एकूण 23 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून अन्य 9 जिल्ह्यांमध्येही पाणी पातळीची अवस्था बिकट आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालानुसार राज्यभरात केवळ 17 अब्ज क्युबिक मिटर भूजल उपलब्ध आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या  जिल्ह्यात भूजल पातळीत 44 मिटरहून जास्त घट झाली असून इतर अनेक जिल्ह्यातही पाण्याची पातळी खालावली आहे.    

June 23, 2024 3:01 PM

views 41

लिची उत्पादनात पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्याचं 60 टक्के योगदान

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जाची लिचीचे उत्पादन घेतले जात असून राज्याच्या लिची उत्पादनात जिल्ह्याचा 60 टक्के योगदान दिले जाते. यामधून शेतकऱ्यांना भरीव उत्पन्न मिळत आहे. पंजाबमध्ये साधारणपणे 3900 हेक्टर क्षेत्रावर लिचीची लागवड केली जाते. तर पठाणकोट जिल्ह्यात हे प्रमाण 2200 हेक्टर इतके आहे. लिचीची पहिली खेप लवकरच परदेशात निर्यात केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि भूजलावरील त्यांचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सुजानपूर येथे यापूर्वीच लिची इस्टेट...