डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दोन्ही सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध प्रश्नांवर केलेली चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला. गदारोळामुळे दोन्ही सदनाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२५ लोकसभेत मांडलं. पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुढे चालवण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली, अखेर लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

 

दरम्यान, नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी लोकसभेत सांगितल की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत देशभरात १ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे ७ हजार ३३६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 

 

राज्यसभेत विरोधी पक्षांनी दिलेले २५ स्थगन प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळले.  विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत  घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर राज्यसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.