डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संसद भवन संकुलात इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक

संसद भवन संकुलात आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनासाठी एक रणनीती आखण्यावर यात चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं.

 

दरम्यान, बिहारमधे सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू अर्थात मतदार यादी पुररिक्षणाच्या विरोधात आज संसद भवन परिसरात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शनं केली. या पडताळणीचा हेतू आणि त्याची कायदेशीर बाजू सरकारनं स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली.