संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून, उद्या सर्वपक्षीय बैठक

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता  सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल .

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.