पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी बंद

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक तसंच मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डोंबिवली शहरात आज या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला आहे. बीड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्या होणारा भीमसंगीताचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. लातूर शहरात मुस्लीम समाजाने मेणबत्त्या पेटवून हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. धुळे शहरातही विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करून आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यात विविध संघटनांनी उद्या जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.