डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय प्रतिनिधी मंडळाने घेतली संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांची भेट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळानं न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी व्‍लादिमीर व्होरोन्कोव्ह आणि नतालिया घेरमन यांनी सुरक्षा परिषदेचा दहशतवाद विरोधी प्रस्ताव आणि संयुक्त राष्ट्रांचं जागतिक दहशतवाद विरोधी धोरण लागू करण्यात सहकार्य वाढवण्यावर भर दिला. 

 

भारताच्या प्रतिनिधी मंडळानं यावेळी दहशतवादी गट आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्यांना प्रतिबंध घालणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या देखरेख पथकाचीही भेट घेतली. भारतीय प्रतिनिधी मंडळ  टी.आर.एफ, म्हणजेच द र‍ेजिस्‍टेंस फ्रंट या संघटनेनं  पहलगाममध्ये केलेल्या  हल्ल्याचे पुरावे या पथकासमोर सादर करणार आहे. टीआरएफ ही पाकिस्तान मधल्या लष्कर-ए-तैयबा  या दहशतवादी गटाशी संबंधित संघटना आहे.  संयुक्त राष्ट्रांनी लष्कर-ए-तैयबा ला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केलं आहे.