डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अफगाणिस्तानकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल अफगाणिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्र व्यवहारमंत्री मावलवी आमिर खान मुताकी यांच्याबरोबर चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल त्यांनी अफगाणिस्तानला धन्यवाद दिले. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खोटे आणि तथ्यहीन अहवाल प्रसिद्ध करत उभय देशांमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या काही देशांच्या प्रयत्नांचा जयशंकर यांनी दृढपणे निषेध केला.