पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संध्याकाळी ६ वाजता ही बैठक संसद भवनात होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीत माहिती देण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात सरकारने योजलेल्या उपायांबद्दल ते सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देतील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.