काश्मीरमधे पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वत्र तीव्र निषेधाची लाट उमटली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २७ जणांचा बळी गेला असून त्यातले बहुसंख्य पर्यटक होते. महाराष्ट्रातल्या ६ पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि गंभीर रीत्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातले आणखी किती पर्यटक तिथं होते याचा शोध राज्यसरकार घेत आहे. पहलगाम आणि जम्मू काश्मीरमधे पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहेत. ते याप्रमाणे. ०१९३२२२२३३७, ७७८०८८५७५९,
९६९७९८२५२७, आणि ६००६३६५२४५. मदत क्रमांक पुन्हा एकदा ऐका….
०१९३२२२२३३७ ,
७७८०८८५७५९,
९६९७९८२५२७, आणि
६००६३६५२४५.
याखेरीज जिल्ह्याजिल्ह्यांमधे मदतीसाठी हेल्पलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.