डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह राज्यात परत आणण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. 

 

डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने, पुण्याचे कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे तसंच नवी मुंबईचे दिलीप डिसले या पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. महसूलमंत्री गिरीश महाजन श्रीनगरसाठी रवाना होत असून इतर पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. 

 

जम्मू काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि गंभीर रीत्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून राज्यातल्या पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा