J & K : केंद्रिय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगर इथं सुरक्षा दलांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उच्च स्तरीय बैठक घेतली. आज ते नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह घटनास्थळी भेट देणार आहेत. तसंच जखमींची विचारपूस करुन ते घटनेच्या साक्षीदारांशी संवाद साधतील.