भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला जगाचा पाठिंबा

जगभरातले भारतीय पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असून भारताला पाठिंबा देत आहेत. अमेरिकेत जॉर्जिया राज्यात अटलांटा इथं भारतीय समुदायाने केलेल्या निदर्शनांमधे तिथले संसद सदस्य रिच मॅकॉर्मिक सहभागी झाले. अतिरेकी दहशतवादाविरोधात जागतिक एकजुटीचं आवाहन त्यांनी केलं. शिकागो, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणी हल्ल्यात बळी पडलेल्यांसाठी प्रार्थनासभा आणि निषेध मोर्चे आयोजित करण्यात आले होते. स्पेन, कॅनडा, स्वीडन या देशातही असे कार्यक्रम झाले.