डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, बागलिहार धरणातलं पाणी अडवलं

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. तसंच झेलम नदीवरल्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. २२ एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी  हल्ल्यात २६ नागरिक मृत्युमुखी पडले होते, त्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा पाणी वाटपाचा  सिंधु करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. १९६० मधे हा करार करण्यात आला होता. बागलिहार धरणावरून भारत आणि पाकिस्तानमधे गेल्या अनेक वर्षापासून वाद आहे.