पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन आज भरलं आहे. कामकाज सुरु करण्यापूर्वी सभागृहाने या हल्ल्यात मरण पावलेल्यांना दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहिली. अध्यक्ष अब्दुल रहीम राथर यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी निषेधाचा ठराव मांडला असून त्यावर चर्चा सुरु आहे.
या भयानक हल्ल्यानंतर विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने केली होती. त्यानुसार नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हे अधिवेशन बोलावलं आहे.