पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे कटरा ते दिल्ली विशेष गाडी आज रात्री सोडणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेने विशेष हेल्पलाईन क्रमांक जम्मू – तावी, श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि उधमपूर या स्थानकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.
श्रीनगर हून दिल्ली आणि मुंबई करता मिळून ४ विशेष विमानं सोडण्यात आली, आणि प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी विमानसेवा उपलब्ध करुन दिल्या जातील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं आहे.