कांतारा – द लिजंट चॅप्टर १, तन्वी द ग्रेट, महावतार नरसिम्हा, टुरिस्ट फॅमिली, आणि सिस्टर मिडनाइट हे ५ भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चरने आज ही घोषणा केली. याशिवाय दशावतार, महामंत्रा, पेपर फ्लॉवर, पारो हे ४ चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र आहेत. एकूण ३१७ चित्रपट ९८ व्या ऑस्कर पुरस्करांसाठी पात्र ठरले आहेत. त्यातल्या २०१ चित्रपटांकडे उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठीची अतिरीक्त पात्रता असल्याचं अकादमीनं जाहीर केलं. या सर्व चित्रपटांमधून ऑस्करसाठी नामांकित झालेल्या चित्रपटांची यादी २२ जानेवारी जाहीर होईल. याशिवाय भारताकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी होमबाऊंड या चित्रपटाचं नामांकन करण्यात आलं आहे.
Site Admin | January 9, 2026 3:39 PM | Oscar Awards
दशावतारसह एकूण ४ चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र