January 9, 2026 3:39 PM

views 119

दशावतारसह एकूण ४ चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र

कांतारा - द लिजंट चॅप्टर १, तन्वी द ग्रेट, महावतार नरसिम्हा, टुरिस्ट फॅमिली, आणि सिस्टर मिडनाइट हे ५ भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चरने आज ही घोषणा केली. याशिवाय दशावतार, महामंत्रा, पेपर फ्लॉवर, पारो हे ४ चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र आहेत. एकूण ३१७ चित्रपट ९८ व्या ऑस्कर पुरस्करांसाठी पात्र ठरले आहेत. त्यातल्या २०१ चित्रपटांकडे उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठीची अतिरीक्त पात्रता असल्याचं अकादमीनं जाहीर केलं. या सर्व चित्रपटांमधून ऑस्करस...

November 5, 2024 1:51 PM

views 24

FTIIच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटाला ऑस्कर पुरस्काराचं नामांकन

पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या Sunflowers Were the First Ones to Know या लघुपटाला ऑस्कर पुरस्कारांच्या लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या प्रकारात नामांकन मिळालं आहे.   चिदानंद नायक याचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात 'ला सिनेफ' विभागात प्रथम पुरस्कार पटकावला होता. ऑस्कर नामांकन जाहीर झाल्यानंतर लघुपटचा दिग्दर्शक चिदानंद नायक यांनी आपली प्रतिक्रिया दिली.