डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

टपाल विभागातर्फे १०० दिवस देशभरात ५ हजार डाक चौपालचं आयोजन

टपाल विभागातर्फे देशभरात राबवण्यात येणार असलेल्या उपक्रमांचा आढावा दूरसंचार मंत्री जोतीरादित्य शिंदे यांनी काल घेतला. टपाल विभाग आजपासून १०० दिवस देशभरात ५ हजार डाक चौपालचं आयोजन करणार आहे. टपाल खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं काय उपाययोजना करता येतील याबाबत काल झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातल्या कामासंदर्भातील सुलभता सुनिश्चित करण्यासाठी डाक चौपाल महत्त्वाची भूमिका बजावतील अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.

 

ग्रामीण निर्यातीला चालना देण्यासाठी १०० दिवसांत ३ हजार निर्यातदार डाकघर निर्यात केंद्र या संकेतस्थळावर आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आवश्यक दस्तऐवजांसाठी मदत, बाजारासंदर्भातली माहिती, बार-कोडेड लेबल आणि सीमेवर लागणारा परवाना पेपरविरहित प्रक्रीयेने उपलब्ध करुन देणं यासह इतर आवश्यक त्या सेवा डाक चौपाल उपक्रमाच्या माध्यमातून पुरवल्या जातील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.