November 3, 2025 7:41 PM

views 29

टपाल विभागाच्या विशेष जनसंपर्क अभियानाचा समारोप

दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागानं गेल्या महिन्याच्या २ ते ३१ तारखेपर्यंत आयोजित केलेल्या विशेष मोहीमेच्या अखेरच्या टप्प्याचा समारोप केला. या मोहिमेअंतर्गत, दूरसंचार मंत्रालयानं २३ हजार चौरस फूट पेक्षा जास्त कार्यालयीन जागा, भंगार आणि टाकाऊ साहित्याच्या विक्रीतून ५७ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं.    या मोहिमेत शाश्वत स्वच्छता, विदा व्यवस्थापन, प्रलंबित प्रकरणांची वेळेवर विल्हेवाट लावणं आणि जागेचा जास्तीत जास्त वापर, यावर भर देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत, मंत्रालयाने...

April 28, 2025 8:31 PM

views 30

पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात पाठवण्यासाठी टपाल विभागाची विशेष सुविधा

देशभरात पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात टपालाने पाठवता यावं याकरता ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु होणार आहे. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. येत्या १ मे पासून ही सेवा सुरु होणार असून त्यात टपालाने पाठवलेल्या साहित्याचा माग काढण्याची सुविधा आहे. सर्व स्तरातल्या व्यक्ती आणि समूहांच्या सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यासाचं साहित्य सहज आणि वाजवी दरात पोहचवण्याची सेवा सरकार देत आहे, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

July 10, 2024 1:06 PM

views 29

टपाल विभागातर्फे १०० दिवस देशभरात ५ हजार डाक चौपालचं आयोजन

टपाल विभागातर्फे देशभरात राबवण्यात येणार असलेल्या उपक्रमांचा आढावा दूरसंचार मंत्री जोतीरादित्य शिंदे यांनी काल घेतला. टपाल विभाग आजपासून १०० दिवस देशभरात ५ हजार डाक चौपालचं आयोजन करणार आहे. टपाल खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं काय उपाययोजना करता येतील याबाबत काल झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातल्या कामासंदर्भातील सुलभता सुनिश्चित करण्यासाठी डाक चौपाल महत्त्वाची भूमिका बजावतील अशी माहिती मंत्रालयानं दिली ...