डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 24, 2025 1:24 PM | operation sindhu

printer

ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून २,२९५ भारतीय मायदेशी परतले

पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंधू अंतर्गत आत्तापर्यंत इराणमधून २,२९५ भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरुप परत आणलं आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली. आज पहाटे इराणमधल्या मशहद इथून एका विशेष विमानानं २९२ भारतीय नागरिक नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती .

 

इस्रायलमधूनही भारतीय हवाई दलाच्या सी सेव्हनटीन या विमानानं १६५ भारतीय नागरिक मायदेशी परतले. माहिती प्रसारण तसंच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी त्यांचं नवी दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. याशिवाय, आज सकाळी इस्रायलमधून आणखी १६१ भारतीय नागरिकांनाही अम्मानमार्गे सुखरुप मायदेशी आणलं गेलं.

 

या मोहीमेअंतर्गतच्या भारताच्या विमानांतून प्रवास करण्यासाठी श्रीलंकेच्या इस्रायलमधल्या  १७ नागरिकांनीही नोंदणी केली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.