June 24, 2025 1:24 PM

views 27

ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून २,२९५ भारतीय मायदेशी परतले

पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंधू अंतर्गत आत्तापर्यंत इराणमधून २,२९५ भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरुप परत आणलं आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली. आज पहाटे इराणमधल्या मशहद इथून एका विशेष विमानानं २९२ भारतीय नागरिक नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती .   इस्रायलमधूनही भारतीय हवाई दलाच्या सी सेव्हनटीन या विमानानं १६५ भारतीय नागरिक मायदेशी परतले. माहिती प्रसारण तसंच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यां...

June 23, 2025 1:11 PM

views 33

ऑपरेशन सिंधू अंतर्गत १,७१३ भारतीय मायदेशी परतले

इराणहून मायदेशी परतलेल्या २८५ प्रवाशांचं परराष्ट्र व्यवहारमंत्री पबित्र मार्गारेटा यांनी रात्री दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. ऑपरेशन सिंधु अंतर्गत आतापर्यंत १,७१३ भारतीयांना मायदेशी आणल्याची माहिती त्यांनी दिली.   इस्रायलमधून घरी परतणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांसाठी भारतानं अम्मान ते नवी दिल्ली या विमानांमध्ये जागा उपलब्ध करुन दिली आहे. इस्रायलमधल्या श्रीलंकेच्या दूतावासानं याची घोषणा केली आहे. तेल अवीव ते अम्मान आणि तेथून दिल्लीला येणाऱ्या विमान सेवा देखील मोफत दिल्या जातील. तथापि, प्रवाशा...

June 22, 2025 2:33 PM

views 37

ऑपरेशन सिंधु अंतर्गत १,११७ भारतीय मायदेशी परतले

ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधे अडकेल्या अकराशे सतरा भारतीय नागरिकांना आतापर्यंत मायदेशी परत आणल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून पहिल्या टप्प्यात ११० नागरिकांना मायदेशी आणलं होतं. दुसऱ्या टप्प्यात २९०, तिसऱ्या टप्प्यात ११७, चौथ्या टप्प्यात ३१० नागरिकांना मायदेशी आणलं गेलं. तर पाचव्या टप्प्यात २९० नागरिक भारतात परतले. उरलेल्या नागरिकांनाही लवकरच मायदेशी परत आणलं जाईल, असं जयस्वाल यांनी सांगितलं.    ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय ना...

June 19, 2025 12:50 PM

views 38

ऑपरेशन सिंधू : उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान नवी दिल्लीत दाखल

ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झालं. इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू ही मोहीम आखली आहे.   पहिल्या टप्प्यात ११० विद्यार्थ्यांना इराणमधून येरेवान या अर्मेनियाच्या राजधानीत आणण्यात आलं आणि तिथून काल दुपारी विमानानं विद्यार्थी भारताकडे परत आले. भारत इराण आणि अर्मेनिया सरकारचा ऋणी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हट...