इराणहून मायदेशी परतलेल्या २८५ प्रवाशांचं परराष्ट्र व्यवहारमंत्री पबित्र मार्गारेटा यांनी रात्री दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. ऑपरेशन सिंधु अंतर्गत आतापर्यंत १,७१३ भारतीयांना मायदेशी आणल्याची माहिती त्यांनी दिली.
इस्रायलमधून घरी परतणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांसाठी भारतानं अम्मान ते नवी दिल्ली या विमानांमध्ये जागा उपलब्ध करुन दिली आहे. इस्रायलमधल्या श्रीलंकेच्या दूतावासानं याची घोषणा केली आहे. तेल अवीव ते अम्मान आणि तेथून दिल्लीला येणाऱ्या विमान सेवा देखील मोफत दिल्या जातील. तथापि, प्रवाशांना नवी दिल्ली ते कोलंबो तिकिटे स्वतःहून घ्यावी लागतील. इस्रायलमधल्या श्रीलंकेच्या दूतावासात आज आणि उद्या नोंदणी सुरू आहे.