ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधे अडकेल्या अकराशे सतरा भारतीय नागरिकांना आतापर्यंत मायदेशी परत आणल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून पहिल्या टप्प्यात ११० नागरिकांना मायदेशी आणलं होतं. दुसऱ्या टप्प्यात २९०, तिसऱ्या टप्प्यात ११७, चौथ्या टप्प्यात ३१० नागरिकांना मायदेशी आणलं गेलं. तर पाचव्या टप्प्यात २९० नागरिक भारतात परतले. उरलेल्या नागरिकांनाही लवकरच मायदेशी परत आणलं जाईल, असं जयस्वाल यांनी सांगितलं.
ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांसह इराणमधून श्रीलंकेच्या नागरिकांना बाहेर काढण्यात वेळेवर मदत केल्याबद्दल श्रीलंकेनं भारत सरकारचे आभार मानले आहेत.