ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झालं. इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू ही मोहीम आखली आहे.
पहिल्या टप्प्यात ११० विद्यार्थ्यांना इराणमधून येरेवान या अर्मेनियाच्या राजधानीत आणण्यात आलं आणि तिथून काल दुपारी विमानानं विद्यार्थी भारताकडे परत आले. भारत इराण आणि अर्मेनिया सरकारचा ऋणी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, इराणमधील भारतीय नागरिकांनी तेहरानमधील दूतावासाच्या संपर्कात राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.