डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात ‘सुभद्रा’ योजनेचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात भुवनेश्वर इथं ओदिशा राज्य सरकारच्या ‘सुभद्रा’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यभरातल्या २१ ते ६० वयोगटातल्या पात्र लाभार्थी महिलांना, पाच वर्षांत ५० हजाराचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. या अंतर्गत वर्षभरात दोन हप्त्यांमध्ये १० हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १० लाखापेक्षा जास्त लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा केला जाईल, तसंच ते लाभार्थी महिलांशीही संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्री २ हजार ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही करणार आहेत. यावेळी ते १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजनही करणार आहेत.