जागतिक आर्थिक पटलावर भारत एक प्रचंड शक्ती म्हणून उदयाला येत आहे- ओम बिर्ला

जगातल्या लोकसंख्येच्या ४५ टक्के लोकसंख्या असणारा आणि जागतिक जीडीपीचा ४० टक्के भाग असणारा भारत हा देश जागतिक आर्थिक पटलावर भारत एक प्रचंड शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ब्रासिलिया इथं केलं. जागतिक आव्हानांना तोंड देत ब्रिक्स राष्ट्रांनी आर्थिक आघाडीवर उल्लेखनीय प्रगती केल्याचं ते म्हणाले. 

संसदीय चर्चासत्राबरोबर बिर्ला यांनी ब्राझिलच्या चेंंबर ऑफ डेप्युटीजच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि भारताच्या दहशतवादाविरोधी भूमिकेची चर्चा केली. अकराव्या ब्रिक्स संसदीय चर्चासत्राला काल सुरुवात झाली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.