May 3, 2025 6:53 PM | netflix

printer

नेटफ्लिक्सनं केली २ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल – टेड सॅरंडोस

आपल्या भारतीय निर्मितीतून नेटफ्लिक्सनं २ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आर्थिक उलाढाल केल्याचं नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सॅरंडोस यांनी सांगितलं आहे. ते आज वेव्ह्ज परिषदेच्या ‘स्ट्रीमिंग दि न्यू इंडिया: कल्चर, कनेक्टिव्हीटी अँड क्रिएटिव्ह कॅपिटल’ सत्रात बोलत होते.

 

देशातल्या काही प्रकल्पांमधून आपल्या कंपनीनं २० हजार कलाकार आणि रोजगार निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली भारतात चित्रपटांची महान संस्कृती असून इथल्या लोकांना चित्रपट पाहायला आणि त्यावर चर्चा करायला आवडतं असं आपलं निरीक्षण असल्याचं ते म्हणाले.   

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.