डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात पदोन्नती

 ऑलिंपिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथे हा समारंभ झाला. त्यांनी नीरज चोप्रा याच्या लष्करी गणवेशावर नवीन पदाचं चिन्ह लावून त्याला अधिकृतपणे बढती दिली.

 

ऑगस्ट २०१६मध्ये चोप्रा याला भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू करण्यात आलं होतं. त्याला मिळालेल्या अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कारानंतर २०२१मध्ये सुभेदार पदावरही बढती मिळाली होती. २०२२मध्ये भारतीय सैन्यातर्फे देण्यात येणारं परम विशिष्ट सेवा पदक देण्यात आलं तसंच सुभेदार मेजर पदावरही बढती देण्यात आली होती.