नीरज चोप्रा क्लासिक २०२५ भालाफेक स्पर्धा येत्या गुरुवारपासून बंगळुरूमधल्या श्री कांतीरवा स्टेडिअमवर सुरु होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा २४ मेपासून सुरु होणार होती. मात्र, ओपरेशन सिंदूर आणि देशाचे ऐक्य प्रदर्शित करण्यासाठी हे आयोजन पुढं ढकलण्यात आलं होतं. ही भारतानं आयोजित केलेली पहिलीच आंतराराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा असून या स्पर्धेचं नेतृत्व ऑलम्पिक विजेता नीरज चोप्रा करणार आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रासह थॉमस रोहलर, एंडरसन पीटर्स आणि इतर अनेक ऑलिम्पिक पदक विजेते सहभागी होणार आहेत.
Site Admin | June 3, 2025 1:31 PM | Neeraj Chopra Classic 2025
बंगळुरूमध्ये ५ जुलैपासून नीरज चोप्रा क्लासिक २०२५ भालाफेक स्पर्धा सुरू
