भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं बंगळुरू इथं झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक २०२५ या जागतिक अॅथलेटिक्स सुवर्ण-स्तरीय स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं. त्यानं ८६ पूर्णांक १८ शतांश मीटर लांब भाला फेकत हा किताब जिंकला. केनियाचा ज्युलियस येगो यानं ८४ पूर्णांक ५१ शतांश मीटरसह दुसरा, तर श्रीलंकेच्या रुमेश पथिरागे यानं ८४ पूर्णांक ३४ शतांश मीटर भाला फेकून तिसरा क्रमांक मिळवला.
Site Admin | July 6, 2025 1:27 PM | Neeraj Chopra Classic 2025
नीरज चोप्रानं क्लासिक २०२५ अॅथलेटिक्स सुवर्ण-स्तरीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं
