दोहा डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं दुसरे स्थान पटकावलं. त्यानं ९० पूर्णांक २३ मीटरच्या विक्रमी अंतरापर्यंत भालाफेक करण्यात यश मिळवलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं ९१ पुर्णांक ६ शतांश मीटर अंतरावर फेक करत पहिलं स्थान पटकावलं.
नीरजनं त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला. ९० मीटरचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं. ही सर्वोत्तम कामगिरी नीरजचं समर्पण, शिस्त आणि खेळाप्रति प्रेमाचा परिणाम असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, याच स्पर्धेत भारताच्या पारुल चौधरीनं महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सहावं स्थान पटकावलं. तिनं नऊ मिनिटं १३ सेकंद आणि ३९ मायक्रो सेकंद वेळ नोंदवून स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला.