विद्यमान विश्वविजेता आणि दोनवेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं डायमंड लीगच्या अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमध्ये ही स्पर्धा होईल.
नुकत्याच झालेल्या सिलेसिया लीगमध्ये त्यानं भाग घेतला नसला, तरी या हंगामातली त्याची कामगिरी उत्तम असल्यामुळे तो डायमंड लीगसाठी पात्र ठरला. अँडरसन पीटर्स आणि लुईज मॉरिशिओ दा सिल्वा यांच्यासारखे त्याचे प्रतिस्पर्धीही या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत. नीरज चोप्रा यानं २०२२ मध्ये डायमंड लीगचं जेतेपद पटकावलं होतं, तर २०२३ आणि २०२४ मध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.