राज्य सरकारच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल नक्षलवादी, आणि दलम सदस्य कोसा मंगलू उईका, उर्फ वर्गेश यानं काल गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. लहानपणापासूनच तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय होता. त्याच्यावर साडेतीन लाख रुपयांचं बक्षीस होतं. माओवादी संघटनेत होणारा त्रास आणि अत्याचाराला कंटाळून वर्गेशनं आत्मसमर्पण केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
Site Admin | November 11, 2025 3:02 PM | Gondia Police | Naxalite
जहाल नक्षलवाद्याचं गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण