November 29, 2025 5:02 PM

views 24

दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांची गोंदिया पोलिसांकडे शरणागती

नक्षल संघटनेतला वरिष्ठ नेता अनंत उर्फ विनोद साय्यणा याच्यासह ११ नक्षली अतिरेक्यांनी काल गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.   यामुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. हे सर्वजण दरेकसा दलम या नक्षल गटाचे सदस्य होते असं गडचिरोली रेंज चे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं.  यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर सरकारनं 89 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. गेल्याच आठवड्यात शरणागतीसाठी मुदत मागणारं पत्र अनंत ने महाराष्ट्रा...

November 11, 2025 3:02 PM

views 46

जहाल नक्षलवाद्याचं गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण

राज्य सरकारच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल नक्षलवादी, आणि दलम सदस्य कोसा मंगलू उईका, उर्फ वर्गेश यानं काल  गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. लहानपणापासूनच तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय होता. त्याच्यावर साडेतीन लाख रुपयांचं बक्षीस होतं. माओवादी संघटनेत होणारा त्रास आणि अत्याचाराला कंटाळून वर्गेशनं आत्मसमर्पण केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.