देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेत बोलत होते. आपल्या सरकारनं सुरुवातीपासूनच दिशाभूल झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेनं काम केलं आहे. त्यामुळेच आज देशात नक्षलवादानं प्रभावीत जिल्ह्यांची संख्या केवळ ११ वर आली असून, केवळ मागच्या काही दिवसांतच ३०३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

आज संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासार्ह, जबाबदार आणि लवचिक भागीदार म्हणून पाहत असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. आज देशात इलेक्ट्रॉनिक्स, औषधननिर्माण, ऑटोमोबाईल, मोबाईल अशा प्रत्येक क्षेत्रात  गुंतवणुकीची लाट उसळली असल्याचं त्यांनी  आज भारतात येत आहे. ही गुंतवणूक भारताला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्रस्थान बनवायला मदतीची ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या प्रगतिमुळे जागतिक संधींना नवा आकार मिळत असल्याचं ते म्हणाले. अलीकडेच युरोपीय मुक्त व्यापार संघटनेसोबत झालेला करार हा त्याचेच उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच जी सेव्हन सदस्य देशांसोबतचा भारताचा व्यापार साठ टक्क्यापेक्षा जास्तीनं वाढला असल्याची माहिती त्यांनी दिली.