डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उपराष्ट्रतींच्या हस्ते उद्घाटन

 

नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उद्घाटन उपराष्ट्रती जगदीप धनखड यांनी केलं. विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये नव्हे, तर तंत्रज्ञानातल्या संधींचा शोध घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  या १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक, विज्ञान, आणि अभियांत्रिकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डिजिटल वर्गांचा सामावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ब्लाॅकचेन यांसारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान आव्हानात्मक, मात्र संधी उपलब्ध करून देणारं असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी ही आव्हानं संधींमध्ये बदलावीत असं ते म्हणाले. 

भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मानव संसाधनाची गरज आहे आणि अशी मानव संसाधनं ही विद्यापीठं तयार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांगितलं.