डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलसाठी ३००० रुपयांत पास मिळणार

महामार्गांवरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्याच्या उद्देशानं येत्या १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे. तीन हजार रुपये किंमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा २०० फेऱ्यांसाठी लागू असेल. राष्ट्रीय महामार्गावर व्यक्तिगत वापराच्या वाहनांना हा पास वापरता येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

 

पास काढण्यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा