डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नाशिकमधे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

त्र्यंबकेशर आणि नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं १३ प्रमुख आखाड्यांचे महंत, साधुसंत, सर्व प्रमुख पुरोहीत संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. 

 

कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी ४ हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत, त्यापैकी काही अंतिम टप्प्यात आहेत, तसंच आणखी २ हजार कोटी रुपयांच्या निविदा काढणार असल्याचं त्यांनी या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

 

कुंभमेळ्याच्या अनुषंगानं गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तसंच नदी वाहती राहण्यासाठी विशेष कामं केली जाणार असल्याचं ते म्हणाले. 

 

या कुंभमेळ्याकरता साधु ग्रामसाठी जागा अधिग्रहीत करण्याचं काम या बैठकीत मार्गी लागलं. याशिवाय कुशावर्तावर होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांवरही एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं. याव्यतिरिक्त या बैठकीत साधुंनी केलेल्या मागण्या विचारात घेतल्या असल्याचं ते म्हणाले. 

 

यंदाचा कुंभमेळा दीर्घकाळ चालणार असून, एकाच तारखेला गर्दी होणार नाही किंवा गर्दीमुळे कोणती दुर्घटना होणार नाही अशाप्रकारे नियोजन केलं जाणार आहे असं ते म्हणाले.

 

या कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा