व्यापार करारांबाबतच्या इतर देशांच्या दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी धाडसी निर्णय घेतल्याबद्दल देशभरातल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शेतकरी संघटनांचे नेते आणि शेतकरी यांनी काल केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
बनावट खतं आणि रसायनं उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नवे कायदे करणार असल्याचा पुनरुच्चार चौहान यांनी यावेळी केला. शेतकरी केवळ भारताचेच नाही तर जगाचे अन्नदाते आहेत. त्यांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा असं चौहान म्हणाले.देशाच्या विविध भागातून शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित होते.