धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने भव्य विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली.
पालकमंत्री सरनाईक यांनी आज २० जुलै रोजी नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली, आणि सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
पर्यटनाला चालना मिळावी,स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि इतिहासाची जपणूक व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या सहकार्याने विशेष योजना आखली जाणार आहे, असं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.