नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजार केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना येत्या २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात ३ पोलीस उपयुक्त, आणि ६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असं पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितलं.
नागपूर शहरात ११ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आजही कलम १६३ अंतर्गत संचारबंदी लागू आहे, शहरातल्या १०० पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.